महात्मा ज्योतिबा फुले हे महिला शिक्षणाचे मूळ आधार : प्राचार्य डॉ.रमेश जोशी

Principal Dr. Ramesh Joshi भुसावळ (13 एप्रिल 2025) : खर्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि मूळ आधार आहेत. त्यांनी महिला शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून त्यांच्या व्यक्तित्व विकासाचा मार्ग प्रशस्त करून दिला. 1887 मध्ये जनतेने मुंबईमध्ये सभेत त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली. भारतात पहिली मुलींची शाळा ही ज्योतिबांनी सुरू केली तसेच महात्मा ज्योतिबांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिल्या प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनविले.
प्रौढांसाठीही देशातील रात्र शाळा ही त्यांनी स्थापन केली. सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली तसेच ते पहिले शिक्षण तज्ञ होते, असे विचार प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी येथे व्यक्त केले.
श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात शुक्रवार, 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी मार्गदर्शन करीत महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सर्व प्राध्यापकांनी व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
