नागपूर हादरले : उमरेड एमआयडीसीतील स्फोटात पाच कामगार ठार


Nagpur shaken : Five workers killed in explosion at Umred MIDC नागपूर (13 एप्रिल 2025) : नागपूरातील उमरेड एमआयडीसीतील एका कंपनीत शुक्रवारी झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. सहा गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कंपनी प्रशासनावर गुन्हा नोंदविण्यात आला. मृतांच्या कुटुंबास 60, तर जखमींना 30 लाखांची मदत दिली जाईल, असे महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

यांचा ओढवला मृत्यू
या दुर्घटनेत पियुष दुर्गे, सचिन मसराम, निखिल शेंडे, अभिलाष जंजाळ आणि निखिल नेहारे यांचा मृत्यू झाला. मनीष वाघ, करण शेंडे, नवनीत कुमरे, पियुष टेकाम, करण बावणे आणि कमलेश ठाकरे हे गंभीर जखमी झाले. सर्व मृतक आणि जखमी कामगार उमरेड आणि भिवापूर तालुक्यातील आहेत.


उमेरड एमआयडीसीमधील एमएमपी कंपनीत शुक्रवार, 11 एप्रिल रोजी झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेत पाच कामगारांचा मृत्यू ओढवला.

मृतकांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून 55 लाख आणि शासनाकडून 5 लाख रुपये अशी एकूण 60 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. जखमी कामगारांना कंपनीकडून 30 लाख रुपये मिळतील. त्यांच्यावर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जातील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

स्फोट झाला तेव्हा गंभीर अवस्थेत वेदनांचा आकांत घेऊन 8 कामगार होरपळत बाहेर पडले, तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कंपनीतील मिक्सर युनिटमध्ये झाली असून यावेळी तब्बल 87 कामगार कर्तव्यावर होते.

पॉलिसिंग ट्यूब (पीटी) बॉक्स लीक असल्याने स्फोट झाल्याचा कामगारांचा आरोप आहे. काहींनी याबाबत वरिष्ठांना अवगत केले. तरीही काम सुरू ठेवण्यात आले. कंपनी प्रशासनाने मात्र चौकशीनंतर या स्फोटाचे कारण सांगता येईल, असे स्पष्ट केले आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !