केर्‍हाळा येथे गोवंशाच्या मांसाची विक्री : एकाला अटक


Selling beef in Kerala : One arrested रावेर (13 एप्रिल 2025) : रावेर तालुक्यातील केर्‍हाळा बु.॥ गावात गोवंशाचे मांस खुल्या जागेत विक्री करणार्‍या एकावर रावेर पोलिसांनी कारवाई करीत त्यास बेड्या ठोकल्या. संशयीताकडून सुमारे एक क्विंटल गोवंश मांस जप्त करण्यात आले. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर तालुक्यातील केर्‍हाळा बुद्रुक गावात एक संशयीत गोवंश जातीच्या गुरांचे मांस अवैधरित्या विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार उपनिरीक्षक तांबे यांनी एक पोलीस पथकाद्वारे केर्‍हाळा बुद्रुक गावातील इंदिरा नगर भागातील खुल्या जागेवरून आरोपी शेख पिरु शेख लाल (55, रा.कुरेशीवाडा, रसलपूर) हा यास अटक केली. आरोपीकडून गोवंश गुरांचे 22 हजार रुपये किंमतीचे 110 किलो मांस आढळून आले. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप काळे यांनी केलेल्या तपासणी हे मांस गोवंशाचे असल्याचे निष्पन्न झाले.


यांनी केली कारवाई
ही कारवाई रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, हवालदार सुनील वंजारी, नितीन डांबरे, योगेश महाजन, राहुल परदेशी आदींनी केली. कॉन्स्टेबल श्रावण भील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !