उभ्या केळीच्या बागेवर मारले तणनाक : साकेगावच्या शेतकर्‍याचे पाच लाखांचे नुकसान


Weeds hit standing banana plantation : Sakegaon farmer loses Rs. 5 lakh भुसावळ (13 एप्रिल 2025) : शहराजवळील साकेगाव शिवारामध्ये रेल्वे लाईनीला लागून असलेल्या अजीम सलीम पटेल या शेतकर्‍याच्या शेतातील केळी खेडावर भामट्याने रात्रीच्या वेळेस तन नाशक मारल्याने शेतकर्‍याचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकर्‍यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे.

अज्ञाताने केळीवर मारले तणनाक
साकेगाव रेल्वे लाईन लगत सर्वे नंबर 430 मध्ये तीन एकर क्षेत्रामध्ये अजीम सलीम पटेल या शेतकर्‍याने कर्ज काढून व हात उचल घेत केळीचे पाच हजार रोप लावले मात्र अज्ञात भामट्याने रात्रीच्या वेळेस तब्बल हजार केळीच्या झाडांवर (खोडांवर) तणनाशक मारून खोडांचे नुकसान केले. यामुळे अजीम पटेल यांचे तब्बल पाच ते सहा लाखांचे बाजार भावाप्रमाणे नुकसान झाले. एकीकडे शेतकर्‍याच्या मालाला किंमत मिळत नाही दुसरीकडे निसर्ग वेळोवेळी साथ सोडून पिकांचे नुकसान करते. याशिवाय परिसरामध्ये जनावरांचादेखील त्रास वाढल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे.


चोरट्यांचा बंदोबस्त करणार ः पोलीस निरीक्षक
नुकसान करणारा तो भामटा कोण ? तो कुठून आला? गावापासून तर शेतापर्यंतचे असलेले सीसीटीव्ही, पायांचे ठसे, तसेच श्वानाद्वारे भामट्याचा माग काढण्यात येईल., असे भुसाळ तालुका पोलिसांनी सांगितले. दरम्यान गावातील शिवारामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत गोपनीय माहितीद्वारे चोरट्यांचा शोध घेवून बंदोबस्त करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी सांगितले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !