भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
भुसावळ (13 एप्रिल 2025) : शहरातील नारखेडे विद्यालयात महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आली. शुक्रवार, 11 रोजी सकाळी आठ वाजता के. नारखेडे विद्यालयात क्रांतीज्योती महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन. झोपे यांच्याहस्ते क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक सुनील राणे, शिक्षक एस.पी.पाठक, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच संगणक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी महात्मा फुले यांच्या जीवन व शिक्षण कार्याचा आढावा मान्यवरांनी मांडला. च सूत्रसंचालन शिक्षक सुनील पी.पाठक यांनी केले.







