शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : 34 लाखांच्या 480 किलो गांजासह संशयीताला बेड्या


Shirpur taluka police take major action : Suspect arrested with 480 kg of ganja worth Rs 34 lakhs शिरपूर (13 एप्रिल 2025) : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल 33 लाख 60 हजार रुपये किंमतीचा 480 किलो गांजा जप्त करीत आरोपीच्या मुसक्या बांधल्या आहेत. या कारवाईने गांजा तस्कर प्रचंड हादरले आहेत. मणिलाल इसमल पावरा (लकड्या हनुमान, ता.शिरपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना लकड्या हनुमान गावाच्या शिवारात संशयीत मणिलाल याने गांजा लपवल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने शनिवारी पथकासह छापेमारी केली. यावेळी शेतात 24 गोणीत तब्बल 480 किलो गांजा आढळल्याने तो जप्त करण्यात आला. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात हवालदार सागर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 15 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकातं धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मिलिंद पवार, चालक अलता मिर्झा, कॉन्स्टेबल प्रकाश भील, कॉन्स्टेबल मुकेश पावरा, कॉन्स्टेबल रोहिदास पवार, कॉन्स्टेबल ग्यानसिंग पावरा, कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, कॉन्स्टेबल जयेश मोरे, कॉन्स्टेबल सुनील पवार तसेच गुन्हे शाखेचे हवालदार पवन गवळी, हवालदार आरीफ पठाण, कॉन्स्टेबल मयूर पाटील आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !