यावलला ठेकेदाराला मारहाण करीत मागितली 50 हजाराची खंडणी : एकाविरोधात गुन्हा


Yavalla contractor beaten up and demanded a ransom of Rs 50,000: Case against one यावल (14 एप्रिल 2025) : शहरातील धनगर वाड्यात म्हसोबा चौकात डांबरीकरणाचे काम सुरू असताना 30 वर्षीय ठेकेदाराला याच भागातील रहिवाशाने तुम्ही चांगले काम करत नाही म्हणत वाद घातला व त्यांना शिविगाळ करून मारहाण करीत त्यांच्याकडे 50 हजार रुपयाची खंडणी मागितली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण
शहरातील धनगर वाड्यात म्हसोबा चौक आहे. या म्हसोबा चौकामध्ये भूषण राजेंद्र पाटील (30) हे ठेकेदार डांबरीकरणाचे काम करत असताना तेथे नरेंद्र उर्फ खन्ना गजानन माळी हा तरुण आला. डांबरीकरणाचे काम तुम्ही बरोबर करीत नाही, असे सांगून काम थांबवण्याचा प्रयत्न केला. ठेकेदाराने कामा बद्दल काही तक्रार असल्यास तुम्ही नगरपालिकेकडे लेखी तक्रार द्या, आमच्याशी वाद घालू नका, असे सांगितले मात्र तरुणाने जर काम सुरू ठेवायचे असेल तर मला 50 हजार रुपये दे, असे सांगत खंडणी मागितली. वाद घालत ठेकेदार व त्यांच्या कामगारांना शिवीगाळ करून मारहाण केली.


याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !