भुसावळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नमा शर्मा यांच्यातर्फे 11 किलो बुंदीचे लाडू वाटप


Namah Sharma भुसावळ (14 एप्रिल 2025) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने शहरातील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते शिव भोजन केंद्र संचालक उमाकांत उर्फ नमा शर्मा यांनी गोरगरीबांना बुंदीचे लाडू, वरण भात, पोळीचे अन्नदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या अन्नदानाचा गोरगरिबांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. सकाळपासून बुंदीचे लाडू वरण, भात आणि पोळी वाटप सुरू करण्यात आले.

11 किलो बुंदीचे लाडू वाटप
शिव भोजन केंद्र संचालक नमा शर्मा हे नेहमी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच गजानन महाराज प्रगट दिन, हनुमान जयंतीला गोरगरिबांना जेवणा सोबत गोड पदार्थांचे अन्नदान करतात. आपणही समाजाचे काही देणे लागतो म्हणून सण उत्सवाचा गोरगरिबांना देखील आनंद घेता आला पाहिजे या मुख्य उद्देशाने गोरगरिबांना मोफत अन्नदान करीत असल्याचे नमा शर्मा यांनी सांगितले.


यांची होती उपस्थिती
यावेळी रमारत्न फाऊंडेशन संचलित क्रांती आई सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना सुभाष शेळके, आरपीआयचे जिल्हा नेते सुदाम सोनवणे, डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष विजय साळवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम यांच्याहस्ते गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी अप्पा मोरे, आरपीआयचे भगवान निरभवणे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे, काँग्रेसचे सरचिटणीस संतोष साळवे, राजु डोंगरदिवे, रहिम गवळी, पँथरचे सिद्धार्थ सोनवणे आदी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !