मुलाला वाचवताना आईसह मावशीचा तापी पात्रात बुडून मृत्यू : यावल तालुक्यातील घटना


Mother and aunt drown in hot water vessel while saving child : Incident in Yaval taluka यावल (15 एप्रिल 2025) : कपडे धुण्यासाठी तापी नदीच्या पात्रावर गेलेल्या चिमुकल्यासह आई व मावशीचा तापी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळील घाणेकर नगराजवळ सोमवारी दुपारी घडली.

काय घडले नेमके
यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ घाणेकर नगर आहे. या घाणेकर नगरात गोंधळाच्या कार्यक्रमाकरिता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पळाशी या गावातून व अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली या गावातून दोन महिला आल्या होत्या. या महिला सोमवारी तापी नदीच्या पात्रात कपडे आणि अंघोळ करण्यासाठी गेल्या असता तापी नदीत असलेल्या एका डोहात पाय घसरून दोन महिलांसह बालकाचा बुडून मृत्यू झाला.



सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व त्यांनी मृतदेह यावल ग्रामीण भागात आणण्यात आले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. एकाच ठिकाणी तिघांचा असा मृत्यू झाल्यामुळे यावल तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

अंजाळे, ता.यावल या गावात नदीच्या पात्राच्या जवळ घाणेकर नगर आहे. तापी नदीच्या जवळ हे घाणेकर नगर असून येथे बादल लहू भिल यांच्याकडे गोंधळाचा कार्यक्रम होता. या गोंधळाच्या कार्यक्रमाकरिता वैशाली सतीष भिल (28), त्यांचा मुलगा नकुल भिल (5, रा.अंतुर्ली, ता.अमळनेर) आणि सपना गोपाल सोनवणे (27, पळाशी, ता.सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) हे आले होते. गोंधळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता ते अंजाळे शिवारातील तापी नदीच्या पात्रात घाणेकर नगर कंपनीजवळ आंघोळ आणि धुणे धुण्यासाठी गेले होते.

नदीपात्रात एका डोहात तिघे बुडालेफ ते पाण्यात बुडाले याची माहिती मिळताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली व याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आलीफयावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख, हवालदार अर्षद गवळी, इस्तीयाक सय्यद, अनिल पाटील, उमेश महाजन घटनास्थळी दाखल झाले तिघांचे मृतदेह तेथुन काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी शव विच्छेदन करीत मृतदेह रात्री आठ वाजता त्यांच्या कुटुंबाला सोपवण्यात आले. या घटनेमुळे यावल तालुक्यातून हळू व्यक्त केली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !