30 हजारांची लाच घेताना धुळ्यात खाजगी तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात

धुळे एसीबीच्या कारवाईने लाचखोर हादरले : बिअर बारवर स्वीकारली लाच


ACB arrests private technician in Dhule while accepting bribe of Rs 30,000 धुळे (16 एप्रिल 2025) : जुन्या वीज मीटरमध्ये छेडछाड केली असल्याचा आरोप करीत कारवाई टाळण्यासाठी 30 हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या धुळ्यातील खाजगी तंत्रज्ञास धुळे एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई मंगळवार, 15 रोजी सायंकाळी उशिरा करण्यात आली. मुकुंद लक्ष्मण दरवडे (प्लॉट नं. 36, संत कबीर नगर, देवपूर, धुळे) असे अटकेतील लाचखोराचे नाव आहे. आरोपीच्या अटकेनंतर हा आता महावितरणमधील संबंधित विभागाचे बडे अधिकारी चौकशीच्या रडारवर असल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

असे आहे लाच प्रकरण
64 वर्षीय तक्रारदार यांचे धुळ्यातील देवपूर भागात जैस्वाल लिकर बार नावाचे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानात जुनी वीज मीटर सुमारे 20 दिवसांपूर्वी वीज कंपनीच्या वतीने मुकुंद दरवडे यांनी बदलवून त्या जागी नवीन मीटर बसवले. त्यानंतर दरवडे याने वेळोवेळी तक्रारदाराच्या दुकानात जात वीज मीटर कार्यालयात जमा केल्याचे सांगून त्यात छेडछाड झाल्याने मोठ्या प्रमाणावर वीज चोरी झाल्याचे सांगितले व वीज कंपनी कार्यालयात आपली ओळख असून सेंटलमेंट करून देतो, त्यासाठी 30 हजार रुपये द्यावे लागतील म्हणत तसे न केल्यास 46 हजारांचा दंड भरावा लागेल, अशी भीती लागली. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करून सापळा रचण्यात आला.

मंगळवार, 15 रोजी मुकुंद दरवडे हा जैस्वाल लिकर बार या दुकानावर आल्यानंतर त्याने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा मोबाईल कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली रा.खांडवी, हवालदार राजन कदम, कॉन्स्टेबल प्रशांत बागुल आदींच्या पथकाने यशस्वी केला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !