धक्का लागल्याच्या वादातून भुसावळात तरुणावर चाकूहल्ला
Youth stabbed in Bhusawal over argument over shock भुसावळ (16 एप्रिल 2025) : धक्का लागल्याच्या वादातून शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला. ही घटना 14 रोजी रात्री 12.40 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके
गौरव भास्कर कापडणे (39, वरणगाव रोड, तक्षशीला नगर, भुसावळ) या तरुणाच्या तक्रारीनुसार, त्यांना संशयीताचा धक्का लागल्याने त्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून संशयीताने हातातील चाकूने पाठीवर हल्ला केला मात्र हाताने वार चुकवल्याने बोटाला दुखापत झाली. याप्रकरणी संशयीत भूषण गणेश शिंदे (लाल जैन मंदिर, तक्षशीला नगर, भुसावळ), चेतन भुसे (खडका रोड, भुसावळ) व गणेश शिंदे (वरणगाव रोड, लाल जैन मंदिराजवळ, भुसावळ) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक् राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांतीलाल केदारे करीत आहेत.





