चोपडा शहरात पाच वर्षीय अल्पवयीनावर अत्याचार


Five-year-old minor raped in Chopda city चोपडा (16 एप्रिल 2025)  : राज्यातील महिला व मुली सुरक्षित नाहीच हे चित्र वारंवार समोर येत आहे. चिमुकलीला कुरकुरे आणून देतो म्हणून नेत नराधमाने अत्याचार केला. चोपडा शहरातील एका भागात ही संतापजनक घटना मंगळवार, 15 रोजी दुपारी तीन वाजता घडली.

या प्रकरणी मयाल गिरदार वास्कले (25, मध्यप्रदेश) विरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी वास्कले याने पाच वर्षीय मुलगी खेळत असताना तिला कुरकुरे घेऊन देतो या बहाण्याने नेत तिच्यावर अतीप्रसंग केला. मुलीने आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली.

नागरिकांपैकी यश चौधरी याने पोलीसांना याबाबत माहिती दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !