जळगावात बंगाली कारागीर दहा लाखांचे दागिणे घेवून रफुचक्कर
Bengali artisans in Jalgaon arrested for taking jewellery worth one million जळगाव (17 एप्रिल 2025) : शहरातील गोलाणी मार्केटमधील मोहित ज्वेलर्स दुकानातून नऊ लाख 87 हजार 413 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून दोन बंगाली कारागीर रफूचक्कर झाले. दोघांविरोधात मंगळवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके
श्याम सुंदर अंबालाल सोनी (58, रा. पटेल नगर) यांचे गोलाणी मार्केटमध्ये मोहित ज्वेलर्स नावाचे दागिन्यांचे दुकान आहे. सोनी हे अनेक वर्षांपासून बंगालमधून आलेल्या कारागीरांकडून दागिने बनवून घेतात. 13 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी सहा वाजता त्यांनी बंगालचे रहिवासी संजय शंकर संतारा व मुस्तफा अली या दोन कारागीरांना सुमारे 143 ग्रॅम वजनाचे व नऊ लाख 87 हजार 413 रुपये किमतीचे सोने दिले. यापासून त्यांनी दागिने तयार करण्याची ऑर्डर दिली होती मात्र दिलेले सोने घेऊन त्यांनी कोणताही दागिना तयार न करता, ते परस्पर वापरून फसवणूक केली आणि पसार झाले. या प्रकारामुळे सोनी कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला.श्याम सुंदर सोनी यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहे.


