शनीपेठ पोलिसांची मोठी कारवाई : गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस बाळगणार्या दोघांना अटक
Shanipeth police take major action, two arrested for carrying a village pistol and four live cartridges जळगाव (17 एप्रिल 2025) शहरातील सदाशिव नगरातील ओम पान सेंटर समोर बेकायदेशीर पणे हातात गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतूस बाळगून दहशत निर्माण करणार्या दोघांना शनीपेठ पोलिसांनी मंगळवारी दुपारी 12 वाजता अटक केली. राकेश दिलीप भावसार (41, रा.सदाशीव नगर) व प्रसाद संजय महाजन (28, रा.ज्ञानदेव नगर, जळगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदाशिव नगरातील ओम पान सेंटरसमोर संशयीत राकेश हा बेकायदेशीरपणे हातात गावठी बनावटीचे पिस्टल व चार काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीसांना मिळाली. पथकाने मंगळवारी दुपारी 12 वाजता कारवाई करीत आरोपीला अटक केली व त्याने 54 हजारात संशयीत प्रसादकडून पिस्टल विकत घेतल्याची कबुली दिल्याने त्यासही अटक करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल पराग दुसाने यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, हवालदार युवराज कोळी, हवालदार रवींद्र बोदवडे, हवालदार शशिकांत पाटील, कॉन्स्टेबल अनिल कांबळे, कॉन्स्टेबल पराग दुसाने आदींच्या पथकाने केली.


