यावल तालुक्यातील गाव कारभार्‍यांच्या निवडीसाठी 21 एप्रिलला आरक्षण सोडत


यावल (17 एप्रिल 2025) :  यावल तालुक्यातील 67 ग्रामपंचायती पैकी 63 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत सोमवार, 21 एप्रिल रोजी काढली जाणार आहे. यावल तहसील कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत जाहिर केली जाणार आहे. त्या-त्या ग्रामपंचायतीतील नागरीकांची उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

63 ग्रामपंचायतीचे आरक्षण निघएणार
यावल तालुक्यात एकुण 67 ग्रामपंचायती आहे. यातील चार ग्रामपंचायतीचे आरक्षण यापूर्वीच जाहिर झाले असून उर्वरीत 63 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण येत्या सोमवार, 21 एप्रिल रोजी जाहिर केले जाणार आहे. सातोद रस्त्यावरील तहसील कार्यालयात आरक्षण सोडत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काढली जाणार आहे. एकूण पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यात अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांचा समावेश आहे. तालुक्यात अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकूण पदे आठ, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे 21, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे दोन, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे 32 आहेत. यातून अनुसूचित जातीच्या महिलांसाठी चार, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी 11, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी एक, सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी 16 असे एकुण 63 पैकी 32 जागा महिलांसाठी आरक्षीत केल्या जणार आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !