मनवेलला वाद्याचे वाहन मंदिराच्या भिंतीस धडकले : वादानंतर मारहाण, दहा जणांविरोधात गुन्हा


Manvel’s vehicle hits temple wall: Beaten after argument, case filed against ten people यावल (17 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील मनवेल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुरू असताना वाद्याच्या वाहनाची धडक मंदिराच्या भिंतीला लागल्याने भिंतीचे नुकसान झाले. याबाबत बोलण्यास गेलेल्या दोघांना 10 जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली व एकाच्या खिशातील पाच हजारांची रोकड आणि एक तोळ्याची सोन्याची चैन लांबवली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दहा संशयीतांविरोधात गुन्हा
मनवेल गावातील पन्नालाल हुकुमचंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गावात आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुरू होती. यात असलेल्या वाद्याच्या एका वाहनाची धडक महादेव मंदिराच्या भिंतीच्या कोपर्‍याला लागून भिंतीची नुकसान झाले. त्याबाबत पन्नालाल पाटील यांनी विचारणा केली असता त्यांना तसेच जयवंत पाटील यांना दोघांना नयन अडकमोल, आदेश इंधाटे, विलास इंधाटे, सुभाष भालेराव, प्रथमेश सोनवणे, भूषण भालेराव, सागर इंधाटे, योगेश इंदाटे, मनोज भालेराव व गोकुळ इंधाटे या दहा जणांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. लोखंडी पाईपने मारून दुखापत केली तसेच त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये रोख आणि गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन अज्ञाताने लांबवली. दहा जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !