उत्तम आरोग्यासाठी आहारात केळीचे प्रमाण वाढवा : डॉ.के.बी.पाटील
रावेर शहरात जागतिक केळी दिन उत्साहात साजरा
Increase the amount of bananas in your diet for better health: Dr. K.B. Patil रावेर (18 एप्रिल 2025) : जागतिक केळी उत्पादनाच्या 30 टक्के केळी आपल्या भारतात उत्पादन होते मात्र तिचे सेवन भारतीयांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. सर्वांगीण दृष्टीने विचार केला असता केळी हे पौष्टीक फळ आहे त्याचे दैनंदिन जीवनशैलीच्या आहारात समावेश केल्यास उत्तम आरोग्य राहिल त्यासाठी दररोज ‘दोन केळी खा आणि निरोगी रहा’ हा आरोग्याचा मंत्र समजून घेतला पाहिजे, असे आवाहन डॉ.के.बी.पाटील यांनी केले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड्स लि. आणि अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघ यांच्यातर्फे रावेर येथे एप्रिल महिन्याच्या तिसर्या बुधवारी अर्थात 16 एप्रिल रोजी सकाळी नऊ 9 वाजता जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला. रावेर पीपल्स बँकेजवळ झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.पाटील बोलत होते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जलतज्ज्ञ डॉ.सुधीर भोंगळे, माजी आमदार अरुण पाटील, केळी महासंघाचे भागवत पाटील, माऊली हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी यांच्याहस्ते केळीचे खोड व घड याचे पूजन करण्यात आले. यावेळी रामदास पाटील-निंबोल, विशाल अग्रवाल, प्रशांत महाजन, सदानंदन महाजन, प्रफूल्ल महाजन, उज्ज्वल अग्रवाल, हरी भिका पाटील, पांडुरंग पाटील, अतुल मधुकर पाटील, यश पाटील, अमोल पाटील-बलवाडी, शैलेंद्र पाटील-शिंगाडा, निलेश पाटील-अजंदा, मंदार मनोहर पाटील यांच्यासह जैन इरिगेशनचे वितरक सोपान पाटील, गुलाब पाटील, आर.जी.पाटील यांची उपस्थिती होती. जैन इरिगेशनतर्फे मान्यवरांचे रूमाल टोपी देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर केळी व केळीच्या ज्यूसचे वाटप केले गेले. यावेळी केळी दिनानिमित्त विशेष सजावटीसह तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर शेतकर्यांसह नागरिकांनी सेल्फी काढले.

केळी हे सहज उपलब्ध होणारे फळ
जागतिक केळी दिन सर्वप्रथम युरोपीयन व अमेरिकन देशांमध्ये साजरा केला जातो. केळी फळातील पोषणमूल्यांबाबत जागरूकता वाढून त्याचे सेवन वाढावे यासाठी केळी दिवस साजरा करण्यामागील भूमिका तसेच जागतिकस्तरावर केळीला अन्नघटकांपैकी महत्त्वाचे मानले जाते. प्रवासामध्ये सहज उपलब्ध होणारे आणि खाता येणारे सुरक्षित असे फळ असल्याचे डॉ. के. बी. पाटील यांनी सांगितले.
जगात 30 टक्के केळीचे भारतात उत्पादन
जगाच्या उत्पादनाच्या 30 टक्के केळी आपण उत्पादित करतो परंतु केळी दिनाचे जे औचित्य आहे त्यातून केळीबाबतची जागरूकता वाढावी. केळी खाण्याचे प्रमाण वाढावे हे असल्याचे डॉ.पाटील म्हणाले. केळी हे न्युट्रीशनचा प्रचंड मोठा स्त्रोत आहे. यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फर, पोटॉशिअम, विटॉमिन बी-6 यासह अन्य अन्नघटक आहेत. दररोज एक केळीचे सेवन केले तर विटॉमिन बी-6 ची पुर्तता शरिरात होते. केळी व केळीपासून तयार होणारे मिल्क शेकचे सेवन केले पाहिजे. ईश्वराने नैसर्गिक पॅकेजिंग केलेले केळी हे फळ आहे. त्याला प्रवासासह कुठेही सेवन करता येते. ती नैसर्गिक रित्या आरोग्याला सुखकर आहेच निसर्गाचं सुद्धा पालन पोषण करणारं हे फळ आहे. त्यामुळे त्याचे आरोग्याच्या दृष्टीने आहारात रोज सेवन करा, असे आवाहन डॉ. के.बी.पाटील यांनी केले.
हा उपक्रम नवचैतन्य निर्माण करणारा
माजी आमदार अरुण पाटील म्हणाले की, जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा करण्याचा उपक्रम म्हणजे नवचैतन्य निर्माण करणारा आहे. जास्त लागवडीपेक्षा निर्यातक्षम गुणवत्ता पूर्ण उत्पादनावर शेतकर्यांनी लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अॅग्रोनॉमिस्ट राहूल भारंबे, मोहन चौधरी, चेतन गुळवे, तुषार पाटील, शुभम पाटील, भास्कर काळे, सागर मोरे, यतिश चौधरी, तुषार हरिमकर यांच्यासह जैन इरिगेशन व जैन फार्मफ्रेश फूड्स चे सहकारी यांनी सहकार्य केले.
