50 हजारांची लाच घेताना खाजगी पंटर जाळ्यात ; तलाठी पसार

Private punter caught taking bribe of Rs 50,000; Talathi spreads नाशिक (17 एप्रिल 2025) : खडी वाहतूक सुरळीत होवू देवून कारवाई टाळण्यासाठी 50 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना खाजगी पंटरासह तलाठ्याला अटक करण्यात आली. रमजान नजीर शेख (28, रा.मांडवे, ता.संगमनेर, जिल्हा अहिल्या नगर) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे तर तलाठी अक्षय बाबाजी ढोकळे विरोधातही गुन्हा दाखल करण्यात असून त्याचा शोध सुरू आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांचा ट्रक द्वारे खडी वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. खडी वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी आणी ट्रकवर कारवाई न करण्यासाठी आरोपी रमजान नजीर शेख (28) याने आरोपी लोकसेवक अक्षय ढोबळे तलाठी सजा मांडवे, तालुका संगमनेर यांच्या वतीने 16 एप्रिल रोजी तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्
यानंतर तक्रारदार यांनी आरोपी लोकसेवक अक्षय ढोकळे तलाठी सजा मांडवे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना आरोपी रमजान शेख यांच्या भेटून यांच्या समक्ष मी पन्नास हजार रुपये देतो, पण माझे खडी वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई करू नका व सुरळीत राहू द्या असे सांगितले असता, आरोपी लोकसेवक तलाठी अक्षय ढोबळे यांनी मी पैसे घेतो पण गाड्या फक्त दोन महिने चालतील असे म्हणून लाच स्विकारण्यास संमती दिली व आरोपी लोकसेवक व खाजगी इसम यांनी मागणी केलेली 50 हजारांची लाच आरोपी रमजान नजीर शेख याने 16 रोजी रात्री नऊ वाजता मारुती मंदिर समोर मांडवे, तालुका संगमनेर येथे स्वीकारली.
आरोपी तलाठी अक्षय ढोकळे याला लाच रक्कम स्विकारण्याबाबत दूरध्वनीवरून कळवून काय करू, असे विचारले असता त्यांनी ठीक आहे उद्या बघू असे म्हणून लाच स्विकृतीस संमती दिली.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील, हवालदार सुनील पवार, नाईक योगेश साळवे, नाईक परशुराम जाधव आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.




