शिरपूर तालुका पोलिसांतर्फे 24 दुचाकी 14 अवजड वाहनांचा लिलाव

Shirpur Taluka Police auctions 24 two-wheelers and 14 heavy vehicles शिरपूर (18 एप्रिल 2025) : शिरपूर तालुका पोलिसांना गस्तीदरम्यान अनेक बेवारस दुचाकीसह अवजड वाहने आढळली मात्र वर्षानवर्षे ही वाहने घेण्यासाठी कुणीही मालक समोर न आल्याने तसेच वाहन मालकाचा सर्व पर्याय वापरूनही शोध न लागल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या आदेशाने या वाहनांचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे मात्र संबंधित वाहन मालकांकडे वाहनाच्या मालकीबाबत काही कागदपत्रे असल्यास त्यांनी पुराव्यासह पोलीस ठाण्यात येवून वाहनाचा ताबा घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.
वेळेत संबंधित पोलीस ठाण्यात हजर न झाल्यास या वाहनांचा पुर्नवापर न करण्याच्या अटीवर लिलाव केला जाणार आहे. बेवारस वाहनांमध्ये 24 दुचाकी असून 14 जड वाहने आहेत. त्यात ट्रॅक्टर, ट्रॉली, व्हॅन, महिंद्रा पिकअप आदी प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.
