प्रवासात महागडे मोबाईल चोरले : धुळे पोलिसांनी मात्र ते शोधून आणले
धुळ्यात 30 तक्रारदारांना मोबाईल सुपूर्द : कारवाईने तक्रारदारांचे उजळले चेहरे

Expensive mobile phones stolen while traveling : Dhule police recover them धुळे (17 एप्रिल 2025) : प्रवासात वा गर्दीच्या ठिकाणाहून भामट्यांनी चोरी केलेले तब्बल 30 मोबाईल शहर पोलिसांनी शोधून आणत ते जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत तक्रारदारांना परत करण्यात आले. मोबाईल चोरी गेल्यानंतर ते कदापी परत मिळणार नाहीत, असा भ्रम तक्रारदारांना असलातरी धुळे पोलिसांनी तो खोटा ठरवला. महागडे मोबाईल परत मिळताच तक्रारदारांच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.
विविध राज्यातून मोबाईल जप्त
धुळे शहर पोलिसांनी चोरी झालेले तसेच हरवलेले तब्बल 30 मोबाईल सेंट्रल इक्युल्पमेंट आयडेन्टी रजिस्ट्रेशनद्वारे गुजरातसह आसाम, मध्यप्रदेश, अहमदनगर, पुणे व नाशिक येथे जावून मोबाईलचा शोध घेत ते परत आणले. पोलीस निरीक्षक दीपक पाटील व सहकार्यांनी याकामी मोठे परिश्रम घेतले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या उपस्थितीत तक्रारदारांना हे मोबाईल परत देण्यात आले. पोलीस निरीक्षक दीपक पाटील व अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर यांनी याकामी मेहनत घेतली.
