दुकानदाराकडून हप्ता वसुलीचा व्हिडिओ चित्रीत : एलसीबीच्या दोघा कर्मचार्‍यांची उचल-बांगडी


Video of installment collection from shopkeeper filmed : Two LCB employees snatched bangles जळगाव (18 एप्रिल 2025) : अवैधरित्या गुटखा व पेट्रोलची विक्री करणार्‍या एका व्यावसायीकाकडील हप्ता मागतानाचा व्हिडिओ चित्रीत झाल्यानंतर तो जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडका-फडकी जळगाव गुन्हे शाखेतील दोघा कर्मचार्‍यांची उचलबांगडी केली आहे तर ड्रग्ज प्रकरणातील पसार संशयीतासोबत झालेल्या संभाषणानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक यांना मुख्यालयी जमा करण्यात आल्याने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गजानन देशमुख व संघपाल तायडे अशी बदली झालेल्या कर्मचार्‍यांची तर पोलीस उपनिरीक्षक दत्ता पोटे असे नियंत्रण कक्षात जमा झालेल्या अ धिकार्‍याचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील कर्मचारी गजानन देशमुख व संघपाल तायडे यांनी अनधिकृतरित्या गुटखा व पेट्रोल विक्री करणार्‍या कंडारी, ता.जळगाव येथील व्यावसायीकाकडे हप्त्याची मागणी केली व हप्ता घेतानाचा व्हिडिओ एकाने चित्रीत करीत तो जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवला. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी या नंतर तडका-फडकी गजानन देशमुख यांची पाचोरा तर संघपाल तायडे यांची फत्तेपूर येथे बदली केल्याची माहिती गुरुवारी माध्यमांना दिली.

पोलीस उपनिरीक्षक मुख्यालयी जमा
जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांनी ड्रग्ज प्रकरणात पसार असलेल्या अरबाज या आरोपीशी आपल्या मोबाईल फोनवरून तब्बल 252 वेळेस संपर्क केल्याचे समोर आल्यानंतर त्यांची चौकशी करून पोटे यांना पोलीस नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे.

आधी लाचखोरांवर झाली कारवाई
काही दिवसांपूर्वी पाचोरा तालुक्यात वाहनधारकांकडून पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयात तुफान व्हायरल झाल्यानंतर तीन पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले होते तर जळगाव शहर पोलीस स्थानकातील दोन कर्मचार्‍यांना एसीबीने लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली होती मात्र आता अवैध धंदे चालकांकडून हप्ता घेतल्याचा व्हिडिओ व ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबत संभाषण झाल्यानंतर झालेल्या कारवाईने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !