धुळ्यात तरुणाची रस्त्यावर डोके आपटून हत्या

वाहनाचा कट लागल्याचे निमित्त : दोन संशयीत पोलिसांच्या ताब्यात


Youth killed after hitting head on road in Dhule धुळे (18 एप्रिल 2025) : वाहनाचा कट लागल्यानंतर जाब विचारल्याच्या वादातून शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाला जमिनीवर आपटल्याने त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदी रोडवर घडली. फैज अहमद हुसेन अन्सारी (17, धुळे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाहनाचा कट लागल्याचे निमित्त
फैज हा शहरात मेडिकल दुकानात कामाला होता व कुटूंबाला हातभार लावत होता. बुधवारी रात्री उशिरा तो दुचाकीवरून घरात येत असताना अज्ञात वाहन समोर आल्याने त्याचा कट लागला व त्यावरून झालेल्या वादानंतर संशयीतानी शिविगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. दोघे एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर फैजचे डोके सुमारे 5 ते 6 वेळा आपटले.

फैजला अत्यवस्थ स्थितीत हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मोहंमद साजिद अब्दुल अन्सारी यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव रोड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक एस.टी.घुसर तपास करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !