भुसावळात लहान मुलांच्या वादातून कुटूंबाला मारहाण : आठ संशयीताविरोधात गुन्हा

Family beaten up over minor dispute in Bhusawal : Case filed against eight suspects भुसावळ (18 एप्रिल 2025) : लहान मुलांच्या भांडणातून शाब्दीक वाद विकोपाला गेल्यानंतर कुटूंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेत दोघे जखमी झाले तर अन्य जणांना किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी आठ संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हाणामारीचा प्रकार शहरातील देना नगरात बुधवार, 16 रोजी रात्री आठ वाजता घडला.
काय घडले नेमके
नलिनी डिगंबर सोनवणे (60, देना नगर, काशी विश्वेश्वर मंदिराजवळ, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या नातवाचे व संशयीताच्या नातीनचे खेळण्याच्या वादातून भांडण झाले व त्यातून शाब्दीक वाद विकोपाला गेल्याने आरोपींनी फिर्यादीची सून शीत, भाचजावई अनिल सोनवणे व ललित नेमाडे यांना शिविगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी ललन याने अनिल सोनवणे यांच्या डोक्यात वीट मारली तर आरोपी ललितने दिनेश नेमाडे यांच्या डोक्यात काठी मारून दुखापत केली व आरोपींनी आमच्या नांदी लागल्यास जीव ठार मारू, अशी धमकी दिली. याप्रकरणी संशयीत मुन्नीबाई हंसराज पासी, हंसराज पासी, ललन पासी, अभय पासी, दिनेश पासी, आकाश पासी, विशाल पासी, अनिकेत पासी (सर्व रा.देना नगर, विशेश्वर मंदिराजवळ, भुसावळ) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुमन राठोड करीत आहेत.