भुसावळातील युवकाची तापी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या


A youth from Bhusawal committed suicide by jumping from the bridge of Tapi river. भुसावळ (18 एप्रिल 2025) : शहरातील यावल रोडवरील राहुल नगरातील रहिवासी रितीक सुनील वाघ (22) या युवकाने तापी नदीच्या पूलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

यावल रोडवरील राहुल नगरातील रितीक वाघ या युवकाने तापी नदीच्या पूलावर जात खाली नदीत उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. रितीक याने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी तापी नदीच्या पूलावरच हंबरडा फोडला. रितीक याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. रितीक याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला तेथे त्याचे विच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचमाना केला. शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !