वरखेडे शिवारात बिबट्याने गोठ्यातून वासरू पळवले


चाळीसगाव (19 एप्रिल 2025) : चाळीसगाव तालुक्यामधील वरखेडे-दरेगाव रस्त्यावरील एका शेतात बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून त्याला ठार मारले. बिबट्याने गोठ्याची जाळी तोडली.

बिबट्याने डरकाळी फोडल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकर्‍यांनी सांगितले. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील परिस्थिती आणि वासराला ओढून नेल्याच्या खुणांवरून बिबट्याची खात्री पटलेली आहे. वरखेडे शिवारातच एका अन्य शेतातील पाण्याच्या हौदात याआधी एका शेतकर्‍याला बिबट्या आढळून आला होता. बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी इथे होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !