ममुराबाद गावात किरकोळ कारणावरून तरुणाला 16 संशयीतांची मारहाण
A young man was beaten up by 16 suspects over a minor reason in Mamurabad village जळगाव (19 एप्रिल 2025) : जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात किरकोळ झालेल्या वादातून एका तरुणाला गावातील तब्बल 16 जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवार, 16 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता घडली. या संदर्भात गुरुवार, 17 एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजता 16 जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात बुद्धभूषण भानुदास सोनवणे (31) या तरुणाचे गावातील लताबाई सोनवणे आणि दीक्षा सोनवणे यांच्यासोबत बुधवार, 16 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता किरकोळ शाब्दिक वाद झाला. या वादातून गावात राहणारे महेंद्र दिलीप सोनवणे, लताबाई दिलीप सोनवणे, दीक्षा राजेंद्र सोनवणे, सुरेखा राजेंद्र सोनवणे, रेखाबाई प्रवीण सोनवणे, विनोद भागवत सपकाळे, ज्ञानदेव सोनवणे, रोहित प्रवीण सोनवणे, दीपक प्रवीण सोनवणे, भगवान आधार सोनवणे, वैशाली विनोद सपकाळे, वंदना जितेंद्र सोनवणे, रीता महेंद्र सोनवणे, दिलीप कौतिक सोनवणे, नितीन प्रकाश बाविस्कर आणि प्रवीण कौतीक सोनवणे (सर्व राहणार ममुराबाद) यांनी बुद्धभूषण सोनवणे याला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून दुखापत केली. या संदर्भात गुरुवार, 17 एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजता बुद्धभूषण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणार्या वरील 16 जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश चिंचोरे करीत आहे.