जामुनझिरा येथील 20 वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू


20-year-old youth from Jamunzira dies of snakebite यावल (19 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील तामुनझिरा येथे 20 वर्षीय तरुणाला घरात सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी घडलीयाप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शेवला राजाराम बारेला (20) असे मृताचे नाव आहे.

घरातच झाला सर्पदंश
शेवला हा तरुण गुरुवारी सकाळी आपल्या घरी असताना त्याला सापाने उजव्या हाताला दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, कादर तडवी आदींनी त्याच्यावर उपचार केले. मात्र उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसात राजाराम बारेला यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत शेवला बारेला यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !