भुसावळात लहान मुलांच्या वादातून हाणामारी : दुसर्‍या गटाच्या सहा जणांविरोधात गुन्हा


Fight over children’s dispute in Bhusawal : Crime against six people from another group भुसावळ (19 एप्रिल 2025) : चिमुकल्यांच्या शाब्दीक वादातून मोठे हाणामारीवर पोहोचल्याची घटना शहरातील काशी विश्वेर मंदिराजवळील देना नगरात बुधवार, 16 रोजी रात्री आठ वाजता घडली होती. याप्रकरणी पहिल्या गटातर्फे दिलेल्या तक्रारीवरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर गुरुवारी दुसर्‍या गटाच्या तक्रारीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुन्नाबाई हंसराज पासी (58, विश्वेश्वर मंदिराजवळ, भुसावळ) यांच्या तक्रारीवरून, संशयीत नलिनीबाई सुरवाडे, किरण सुरवाडे, ललित नेमाडे, अनिल सोनवणे, छाया सोनवणे, शीतल सुरवाडे व अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांनी तक्रारदाराच्या सुनेसह मुलाला शिविगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत तक्रारदराच्या सुनेची पोत तुटून नुकसान झाले तसेच आरोपींनी जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तेजस पारीसकर करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !