थोरगव्हाणच्या 37 वर्षीय तरुणाची नैराश्यातून आत्महत्या


यावल (19 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका 37 वर्षीय तरुणाने शुक्रवारी राहत्या घरात विषारी द्रश प्राशण केले. हा प्रकार निदर्शनास येताच त्यास तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

थोरगव्हाण येथील रहिवासी प्रवीण राजेंद्र सपकाळे (37) हा तरुण आपल्या घरी असताना त्याने काहीतरी विषारी द्रश प्राशन केले. त्याची पत्नी माहेरून न आल्याने तरुण नैराश्यात होता व त्यातनू त्याने टोकाचे पाऊल उचलले, असे कुटुुंबीयांचे म्हणणे आहे. तरुणाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, डॉ.हर्ष पटेल, दीपाली किरंगे, सुमन राऊत, अमोल अडकमोल आदींनी तातडीने उपचार सुरू मात्र तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !