भुसावळ शहरात उद्या रविवारी राष्ट्रीय एकात्मता मॅरेथॉन


National Integration Marathon to be held in Bhusawal city tomorrow, Sunday भुसावळ (19 एप्रिल 2025) : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशन व भुसावळ तालुका बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रविवार, 20 एप्रिल रोजी पहाटे सहा राष्ट्रीय एकात्मता मॅरेथॉन (रनिंग) स्पर्धा होत आहे.

उद्घाटक केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे असतील. प्रा.डॉ.सुनील नेवे, अ‍ॅड.राजेश झाल्टे, डॉ.राजेश मानवतकर, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, गट विकास अधिकारी डॉ.सचिन पानझडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, शहर पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, वाहतूक सहाय्यक निरीक्षक उमेश महाले, वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर, उपस्थित राहतील.
या स्पर्धेत जास्तीत-जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक कराटे प्रशिक्षक भीमज्योत शेजवळ, नरेंद्र म्हस्के, सुनील आराक, जे.जी.जाधव, प्रदीप साखरे, बी.एन.पाटील, के.आर.सोनवणे यांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !