रांजणगाव फाट्यावर रस्ता लुटीचा प्रयत्न फसला

ग्रामस्थांसह पोलिसांची तत्परता कामी : उद्योजकाच्या वाहनावर फेकले दगड


Attempt to rob road at Ranjangaon junction foiled चाळीसगाव (20 एप्रिल 2025) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रांजणगाव फाट्याजवळ रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांवर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न सतर्क नागरिकांसह पोलिसांमुळे फसला. या घटनेने मात्र वाहनधारकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

काय घडले नेमके ?
शुक्रवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास मार्गावर लुटारूंनी दुचाकीला अपघात झाल्याचा बनाव करीत संशयीत रस्त्यावर आडवे पडले व त्याचवेळी क्रुझर वाहन आल्यानंतर लुटारूंनी वाहनाची चावी काढण्याचा प्रयत्न केला तर वाहनधारकांनी प्रसंगावधान राखत पोलिसांना घटना कळवली तर याचवेळी चाळीसगाव येथील उद्योजक राज पुन्शी हे आपल्या मित्रांसमवेत कन्नडकडून चाळीसगावकडे येत असताना लुटारूंनी त्यांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न करीत वाहनावर दगड टाकला मात्र वाहन न थांबवल्याने लूट टळली तर वाहनाचा काच मात्र फुटला.


पुन्शी यांनी महामार्ग तसेच ग्रामीण पोलिसांना माहिती कळवल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक राहुल कुमार व कर्मचारी दाखल झाल्यानंतर शोध मोहिम राबवण्यात आली मात्र संशयीत अंधाराचा फायदा घेत पसार झाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !