एटीएमची अदलाबदली करीत भुसावळात रेल्वेच्या सेवानिवृत्त अभियंत्याला 56 हजारांचा गंडा


भुसावळ (20 एप्रिल 2025) : एटीएममध्ये पैसे काढण्याचा बहाणा करीत रेल्वेच्या सेवानिवृत्त अभियंत्याकडील एटीएम घेत पासवर्डद्वारे रक्कम काढून 56 हजारांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले भुसावळात ?
संतशरण गुप्ता (62, अनिल नगर, भुसावळ) हे रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले अभियंता आहेत. शनिवार, 12 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ते जामनेर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या एटीएम सेंटर येथे गेल्यानंतर अज्ञाताने पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करीत एटीएम कार्डाची अदला-बदली केली. नंतर या एटीएम कार्डचा वापर करून वेळोवेळी सात वेळा 56 हजार 711 रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शनिवारी अज्ञाताविरोधाता गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल महेश चौधरी करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !