अमळनेर पोलिसांची कारवाई : 107 गावांची सनद असलेले लॅपटॉप लांबवणर्‍या भामट्याला बेड्या


Amalner police action: A thief who stole a laptop with charters of 107 villages is arrested अमळनेर (20 एप्रिल 2025) :  अमळनेर भूमी अभिलेख कार्यालयातून महत्त्वाचे दस्तऐवज असलेला लॅपटॉप लांबविणार्‍या चोरट्याला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे व लॅपटॉप जप्त केला आहे. प्रशांत जगन वाल्डे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयीत निष्पन्न
अमळनेरच्या स्टेशन रोडवरील भूमी अभिलेख कार्यालयाचे कुलूप तोडून 3 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान लॅपटॉप चोरीला गेल्याची तक्रार अधिकारी स्मिता पोरशा गासवीत यांनी दाखल केली होती. परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले आणि दत्तात्रय निकम यांनी तातडीने चोरट्याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या गुन्ह्याचे तपासी अंमलदार अशोक साळुंखे, हवालदार मिलिंद सोनार, हवालदार विनोद भोई, नीलेश मोरे आणि विनोद संदानशिव यांच्या पथकाने शहरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली.

तपासणीदरम्यान, यापूर्वी अनेकदा पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला प्रशांत जगन वाल्डे हा फुटेजमध्ये दिसला. पोलिसांना त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. तो अंकलेश्वरला गेलेला होता. तेथून तो अमळनेरला परतताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. खाक्या दाखवताच प्रशांतने लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली. लॅपटॉप त्याने अंकलेश्वरला नेला होता. पोलिसांनी तत्काळ अंकलेश्वरला जाऊन लॅपटॉप जप्त केला. भूमी अभिलेख कार्यालयातील महत्त्वपूर्ण डेटा लॅपटॉपमध्ये सुरक्षित असल्याचे तपासात समोर आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !