रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने रेल्वेतील सेवानिवृत्त पोलिसाला दहा लाखांचा गंडा : भुसावळातील प्रशांत अग्रवालला अटक
भुसावळ (22 एप्रिल 2025) : रेल्वेत हेड क्लर्कची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत नऊ लाख 64 हजार रुपये उकळून फसवणूक करणार्या शहरातील प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
वसंत जानबाजी ढोणे (65, जुना टोल नाका, फेकरी) हे लोहमार्ग पोलिसातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत. त्यांच्या मुलाला रेल्वेत हेड क्लार्क म्हणून नोकरी लावून देतो म्हणून संशयीत प्रशांत अग्रवालने रोख व डीडी स्वरुपात वेळोवेळी नऊ लाख 64 हजार 60 रुपये वेळोवेळी बालाजी कॉम्प्युटर ग्राहक सेवा केंद्रासह बियाणी चेंबर्सवर घेतले. 26 डिसेंबर 2023 ते 2 नोव्हेंबर 2024 दरम्यान फसवणुकीचा प्रकार घडला. नोकरीबाबत वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने व फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने ढोणे यांनी सोमवारी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून प्रशांत अग्रवाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहे.


