धुळे गुन्हे शाखेची कामगिरी : एक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुविख्यात वसीम बाटला जाळ्यात

आरोपीविरोधात 14 गंभीर स्वरूपाचे गुन्हे : चाळीसगाव रोड पोलिसांच्या गुन्ह्यात आरोपी वॉण्टेड


Dhule Crime Branch’s performance: Notorious Wasim Batla, who had been evading police for a year, caught धुळे (22 एप्रिल 2025) : धुळ्यातील कुविख्यात गुंड सत्तार मेंटलचा साथीदार वसीम बाटला यास तब्बल एक वर्षानंतर अटक करण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीविरोधात चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल आहे शिवाय 14 गंभीर स्वरूपाचे गुन्हेदेखील त्याच्याविरोधात दाखल आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना आरोपी धुळ्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. शंभर फुटी रोडवरील डायमंड हॉलमागून आरोपीला पाठलाग करून अटक करण्यात आली. वसीम हुसेन शेख उर्फ वसीम बाटला (40, प्लॉट नं.49, जनता सोसायटी, वडजाई रोड, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दाखल आर्म अ‍ॅक्टच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, हवालदार हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, प्रल्हाद वाघ, सुशील शेंडे, महेंद्र सपकाळ आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !