बोदवड तालुक्यात कौटूंबिक वादातून पत्नीला पेटवले : पतीला बेड्या


Wife set on fire over family dispute in Bodwad taluka: Husband handcuffed बोदवड (23 एप्रिल 2025)  : बोदवड तालुक्यातील हरणखेडे येथे कौटुुंबिक वादातून पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या गाऊनला पेटवल्याने या घटनेत पत्नी भाजली. याप्रकरणी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली.

अश्विनी ईश्वर गवळी (28, हरणखेड) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. विवाहिता गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 19 रोजी रात्री 10.30 वाजता आरोपी तथा पती ईश्वर कोंडीराम गवळी याने दारूच्या नशेत वाद घालत गाऊनला आग लावली. या घटनेत विवाहितेच्या पोटावर, दोन्ही पायावर, हातावर जखमा झाल्या. विवाहितेने बुलढाणा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर तो बोदवड पोलिसात वर्ग करण्यात आल्यानंतर आरोपी पतीला अटक करण्यात








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !