जळगावात सेरेब्रल पाल्सीच्या उपचारादरम्यान दोन बालके दगावली
कुटूंबियांचा रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप
Two children die during treatment for cerebral palsy in Jalgaon जळगाव (23 एप्रिल 2025) जळगावात सेरेब्रल पाल्सीच्या उपचारासाठी आलेल्या अडीच व तीन वर्षीय बालकांचा इंजेक्शन दिल्यानंतर मृत्यू झाल्याची दुदर्र्ैवी घटना समोर आल्यानंतर पालक संतप्त झाले आहेत. याप्रकाराला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत पालकांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
काय घडले जळगावात
जळगावातील स्टेडीयम नजीक डॉ.हर्षल जावळे यांच्या जावळे हॉस्पीटलमध्ये जळगाव जिल्ह्यातील अडीच व तीन वर्षीय बालकाला सेरेब्रल पाल्सी (जन्मावेळी मेंदूला अल्प रक्तपुरवठ्यामुळे होणार आजार) आजाराच्या उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र जावळे हॉस्पिटलमध्ये महागडे इंजेक्शन दिल्यानंतर एका बालकाचा 18 रोजी तर दुसर्या बालकाचा 20 रोजी इंजेक्शन दिल्यानंतरच्या चार तासांनी मृत्यू ओढवल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे शिवा या संदर्भात कारवाईसाठी पोलिसात तक्रार दिली आहे.
इंजेक्शनच्या संपूर्ण बॅच परत मागवल्या
डॉ.जावळे यांनी या संदर्भात सांगितले की, संबंधित इंजेक्शनच्या संपूर्ण महाराष्ट्रातील बॅच मागवण्यात आल्या आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांना इंजेक्शन देण्यापूर्वीच त्याबाबतचा धोका कळवण्यात आला होता. घडल्या प्रकाराने आम्हालादेखील धक्का बसला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्याशिवाय काही अधिक सांगता येणार नाही मात्र आम्ही उपचारात हलगर्जीपणा केला असल्याचे स्पष्ट झाल्यास कारवाईदेखील सामोरे जावू, असेही त्यांनी सांगितले.
रुग्णवाहिकेत व उपचारादरम्यान मृत्यू
डॉ.जावळे म्हणाले की, सेरेब्रल पाल्सी या आजाराच्या या दोन्ही बालकांवर उपचार करत असताना त्यांना बुटॉक्स नावाचे इंजेक्शन तसेच भूल संदर्भातील औषधे देण्यात आली. शुद्धीवर आल्यावर चार तासानंतर दोघा बालकांची प्रकृती गंभीर झाली. एकाचा दुसर्या रुग्णालयात हलवताना रुग्णवाहिकेत तर दुसर्या बालकाचा दुसर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
आरोपानुसार पोलिसांचा तपास पोलीस उपअधीक्षक
दोन्ही बालकांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, बालकाच्या पालकांनी केलेल्या आरोपानुसार योग्य तो तपास करून कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत म्हणाले.