भुसावळ शहरातील तरुणाची दुचाकी लांबवली


A young man’s bike was stolen from Bhusawal city भुसावळ (23 एप्रिल 2025) : शहरातील मौर्या मंगल कार्यालयाबाहेरून तरुणाची दुचाकी लांबवण्यात आली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भूषण सुधाकर बोरनारे (33, आरएमएस कॉलनीजवळ, भुसावळ) या तरुणाच्या तक्रारीनुसार, 8 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता शहरातील मौर्या मंगल कार्यालयात आल्यानंतर पार्किंगमध्ये दुचाकी (एम.पी.10 एम.एल.5899) लावल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकीचा तपास न लागल्याने चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहेत.


 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !