जळगावातील अशोक लिकर गॅलरीतून चोरट्यांनी दहा लाखांची दारू लांबवली
Thieves steal liquor worth Rs 10 lakh from Ashok Liquor Gallery in Jalgaon जळगाव (23 एप्रिल 20225) : भुसावळ शहरातील मद्य विक्रेते अशोक नागराणी यांच्या जळगावातील दारू दुकानातून चोरट्यांनी दहा लाखांचे मद्य लांबवल्याने खळबळ उडाली. ही घटना बुधवारी सकाळी 23 उघडकीस आली. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले असून डिव्हिआर देखील चोरून केला आहे.
शटर तोडत केली चोरी
भुसावळ येथील रहिवासी असलेले अशोकशेठ नागराणी यांचे जळगावात ईच्छादेवी चौफुलीजवळ महामार्गालगत अशोका लिकर गॅलरी नावाने मद्य विक्री दुकान आहे. मंगळवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधत दुकानाचे शटर उचकवून आत प्रवेश केला.
दरम्यान, चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत गल्ल्यातील 70 हजार रुपये रोख रक्कम आणि जवळपास 126 बॉक्स देशी विदेशी दारू लंपास केली. दारूची एकूण रक्कम अंदाजे 10 लाख रुपये आहे. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले असून डिव्हिआर देखील चोरून केला आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, जिल्हापेठ पोलीस आणि एलसीबी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक टीमने ठसे व अन्य पुरावे गोळा केले.