सावद्यात स्त्री जातीचे मृत अर्भक फेकले : अज्ञात मातेविरोधात गुन्हा
Dead female infant thrown in Sawada : Crime against unknown mother सावदा (25 एप्रिल 2025) : शहरातील नगीना मशिदीच्या उजव्या बाजूस असलेल्या इलेक्ट्रीक पोलजवळ अज्ञात मातेने पाच महिन्यांचा गर्भ असलेले मृत स्त्री जातीचे अर्भक फेकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना 24 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात मातेविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेख रहिम शेख मंजूर (47, सावदा) यांनी याप्रकरणी सावदा पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. सावदा पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला सुरूवात केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय देवरे करीत आहेत.





