पहलगाम हल्ल्याचा निषेध : यावलमध्ये मूक मोर्चा
सकल हिंदू समाजातर्फे ईस्लामी दहशतवाद्यांचा पुतळा जाळला

Pahalgam attack : Silent march in Yaval यावल (27 एप्रिल 2025) : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाल्याने या घटनेच्या निषेधार्थ यावल शहरातील सकल हिंदू बांधवांनी भव्य निषेध मूक मोर्चा काढला. यावेळी इस्लामी दहशतवाद्यांच्या प्रतीक्षकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मूक मोर्चा समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक संस्था आणि विविध स्तरांतील नागरिक एकवटले होते.
भ्याड हल्ल्याचा निषेध
बोरावल गेट यावल येथून मोर्चाला सुरुवात झाली. मेन रोडमार्गे तहसील कार्यालयापर्यंत विशाल जनसमुदायने शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला. अखिल हिंदू मानवतेवर झालेल्या या अमानवी आणि भ्याड हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी तमाम सकल हिंदू बांधवांच्या वतीने यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ा निवेदनाद्वारे केंद्र व राज्य सरकारने ठोस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चामध्ये आमदार अमोल जावळे, डॉ.कुंदन फेगडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, समाज बांधव व माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप हिंदू पर्यटकांना सर्व सहभागी बांधवांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावल शहरातून शांततेत निघालेला हा मुक मोर्चा एकतेचा आणि जनजागृतीचा संदेश देणारा ठरला.