सावदा शहरातील 21 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या


21-year-old youth commits suicide by hanging himself in Savda city सावदा (27 एप्रिल 2025) : सावदा शहरातील मस्कावद रोड परिसरातील भोईवाडा भागातील रहिवासी विनायक उर्फ विकी मोनज पवार (21) या तरुणाने शुक्रवारी दुपारी राहत्या घरात आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. भोईवाडा परिसरात विकी पवार हा तरुण आपली आई, विवाहित बहिण, लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
तरुणाचे फैजपूर रोडवर पवार अ‍ॅक्वा नावाचे दुकान असून तरुणाने शुक्रवारी दुपारी राहत्या घराच्या छताच्या कडीला दोरी लावून गळफास घेतला. सावद्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक फौजदार संजय देवरे यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी पाहणी केली. घरातील आधार असलेला युवक गेल्याने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या यशस्वी उद्योजक तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !