धुळे गुन्हे शाखेची कामगिरी : लिप्टच्या बहाण्याने लूट करणार्या भामट्यांना बेड्या
23 हजारांचा मुद्देमाल जप्त : दोन पसार साथीदारांचा कसून शोध

Dhule Crime Branch’s performance : Chains to the crooks who looted on the pretext of bribery धुळे (26 एप्रिल 2025) : पादचार्याला लिप्टच्या बहाण्याने दुचाकीवर बसवत नंतर शस्त्राचा धाक दाखवून लूटण्यात आले होते. 19 रोजी मध्यरात्री सुरत बायपासवर ही घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे गुन्हे शाखेने शहरातील दोघत्तंना बेड्या ठोकत त्यांच्याकडून लुटीतील 22 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लिप्टच्या बहाण्याने लूट
अजय आनंदा मोरे (जुने भदाणे, जि.धुळे) हे शनिवार, 19 एप्रिलच्या मध्यरात्री 1.30 वाजता सुरत बायपास रस्त्यावरुन पायी जात असताना दुचाकीवरून चौघे संशयीत आले व त्यांनी लिफ्ट देण्याचा बहाणा करत मोरे यांना दुचाकीवर बसवले. पुढे हॉटेल चंद्रदीप समोर पोहोचताच त्यांनी मोरे यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवत खिशातील तीन हजार रुपये रोख, विवो कंपनीचा मोबाईल हिसकावला व फोन पे अॅपचा पीन नंबर मिळवून त्याच्या खात्यातून 7,200 रुपये काढून घेतले. धुळे शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना आरोपींबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी निददृश दिल्यानंतर चैतन्य जगदीश पाटील (24, रेणुका नगरामागे, सेक्टर नंबर एक, चितोड रोड, धुळे) व विशाल उर्फ कल्लू मधुकर भामरे (32, सुरक्षा पोलीस कॉलनी, आश्रमशाळेमागे, चितोडरोड, धुळे) यांना अटक केली.
23 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून 10 हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल, दोन हजार 870 रुपयांची रोकड तसेच 10 हजार रुपयांची हिरो एच.एफ.डिलक्स दुचाकी असा एकूण 22 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक होईल, असे सूत्रांनी सांगितले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, उपनिरीक्षक सतीश जाधव, हवालदार संदीप पाटील, मायूस सोनवणे, संतोष हिरे, सुरेश भालेराव, प्रकाश सोनार, नितीन दिवसे, किशोर पाटील व योगेश जगताप आदींच्या पथकाने केली.
