पाकिस्तानातील 16 युट्यूब चॅनेल्सवर बंदी

16 YouTube channels banned in Pakistan नवी दिल्ली (28 एप्रिल 2025) : पहलगाममध्ये 26 पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारताने दहशतवाद्यांची घरे स्फोटकांनी उडवली होती तर सरकारने आता 16 पाकिस्तानी चॅनल्सवर बंदी घातली आहे. पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून भारताविरोधात गरळ ओकण्याचे काम करीत असल्याने या चॅनेल्सवर भारताने आता बंदी घातली आहे.
शोएब अख्तरसह यांची यूट्युब चॅनेल्स बंद
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तरलाही दणका बसला आहे. केंद्राने बंदी घातलेल्या चॅनेलमध्ये शोएब अख्तर, आरजू काजमी आणि सय्यद मजम्मिल शाह यांच्या चॅनेल्सचाही समावेश आहे.