भुसावळ शहरात मारहाणीत वृद्धेसह दोघे जखमी

Two injured including an elderly man in a fight in Bhusawal city भुसावळ (28 एप्रिल 2025) : शहरातील पंचशील नगरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एकाला शिवीगाळ करत मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या वृद्ध महिलेलाही डोक्यात काठी मारून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले भुसावळात
विक्की रवींद्र इंधाटे (32, रा.पंचशील नगर, बौद्ध विहाराजवळ, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 24 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता त्यांच्या घरासमोरच्या अंगणात यश नंदु वाघ, अलताफ शेख व दानिश शेख (सर्व रा.पंचशील नगर, भुसावळ) यांनी शिविगाळ केली. यास विरोध केला असता यश वाघ याने जमिनीवर पडलेली वीट उचलून विक्की इंधाटेच्या डोक्यावर फेकून मारली त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. दरम्यान आशाबाई सुपडू दाभाडे या मध्ये पडताच संशयीताने त्यांच्या डोक्यावर काठी मारून गंभीर दुखापत केली. तसेच इंधाटे यांची पत्नी हिलाही संशयीतांनी शिवीगाळ करत धमकी दिली की, तुम्ही आमच्याविरुद्ध तक्रार केली तर जिवंत ठेवणार नाही. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत देशमुख करत आहे.