जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : मन्यारखेड्यातील दुचाकी चोरट्यांना बेड्या


Performance of Jalgaon Crime Branch : Two-wheeler thieves in Manyar Kheda arrested जळगाव (29 एप्रिल 2025) : चोरीच्या दोन दुचाकींसह मन्यारखेडा येथील दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. मयुर उर्फ गोल्या बाबुलाल साळुंखे च रामचंद कमलचंद भील (दोन्ही रा.मन्यारखेडा, जि.जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पंकज सरदार राजपुत (पिंप्राळा) यांच्या मालकीची हिरो शाईन (एम.एच.19 डी.एक्स.1534) जळगाव रेल्वे स्टेशनवरून लांबवण्यात आली होती. 16 एप्रिल रोजी झालेल्या चोरी प्रकरणी तसेच गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवाय दुसर्‍या घटनेत 19 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता अब्दुल फारूक खलील देशमुख (फातीमा नगर, जळगाव) यांची हिरो होंडा शाईन (एम.एच.19 बी.वाय 2123) बळीराम पेठ भागातून चोरी झाल्यानंतर जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना आरोपींची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली असता त्यांनी वरील दोन्ही गुन्ह्यांची कबुली देत चोरी केलेल्या दुचाकी काढून दिल्या. विशेष म्हणजे आरोपींचे कुठलेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसताना त्यांना गोपनीय माहितीद्वारे बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपींना अधिक कारवाईसाठी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, एएसआय विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, राजेश मेढे, संजय हिवरकर, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, विजय पल, हरिलाल पाटील, रणजीत जाधव, राहुल महाजन, प्रदीप चौरे आदींच्या पथकाने केली. याकामी नेत्रमचे कॉन्स्टेबल कुंदनसिंग खयास यांनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !