धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : 43 लाखांचा 605 किलो गांजा जप्त

Major action by Dhule Crime Branch : 605 kg of ganja worth Rs 43 lakh seized धुळे (29 एप्रिल 2025) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर तालुक्यातून तब्बल 43 लाखांचा 605 किलो गांजा जप्त केला आहे. शिरपूर तालुका हद्दीतील चिलारे गावाच्या शिवारात टिटवा गावाच्या रोडवरील शेतात ही कारवाई सोमवार, 28 रोजी करण्यात आली. याप्रकरणी रवींद्र गणेश पावरा (रा.चिलारे, ता.शिरपूर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गांजाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना कल्पना दिल्यानंतर दोन पथक तयार करण्यात आले. टीटवा गाव रस्त्यावरील शेतात छापा टाकल्यानंतर पथकाने तब्बल 42 लाख 35 हजार रुपये किंमतीचा 605 किलो गांजा जप्त केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे, हवालदार आरीफ पठाण, हवालदार पवन गवळी, हवालदार पंकज खैरमोडे, कॉन्स्टेबल मयूर पाटील, कॉन्स्टेबल योगेश जगताप, कॉन्स्टेबल जगदीश सूर्यवंशी, कॉन्स्टेबल कमलेश सूर्यवंशी, कॉन्स्टेबल राहुल गिरी, कॉन्स्टेबल गीते, कॉन्स्टेबल गुलाब पाटील तसेच शिरपूर तालुक्याचे हवालदार राजू ढिसले, कॉन्स्टेबल प्रकाश भील, कॉन्स्टेबल ग्यानसिंग पावरा, कॉन्स्टेबल रोहिदास पावरा आदींच्या पथकाने केली.
