धुळे गुन्हे शाखेकडून दोन तासात गुन्ह्याची उकल : गादी भांडारात दोन लाखांची रोकड चोरणार्‍या कामगाराला अटक


Dhule Crime Branch solves crime in two hours : Worker arrested for stealing Rs. 2 lakh cash from Gadi Bhandar धुळे (29 एप्रिल 2025) : धुळे शहरातील गांधी पुतळ्याजवळील बिसमिल्लाह गादी भांडारातून दोन लाखांची रोकड व पॅन कार्ड चोरीला गेले होते. धुळे गुन्हे शाखेने अवघ्या दोन तासात गुन्ह्याची उकल करीत दुकानात काम करणार्‍या कामगाराला बेड्या ठोकल्या आहेत. राकेश रामलाल सावले (34, गरणगाव, भगवानपुरा, खंडवा, ह.मु.वंजारी गल्ली, पाटबाजारामागे, जुने धुळे, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्यातील गांधी पुतळ्याजवळ कलीम सलीम तेली यांच्या मालकिचे बिसमिल्लाह गादी भांडार दुकान आहे. 26 ते 27 दरम्यान चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूला असलेल्या शटरमधून प्रवास करीत दोन लाखांची रक्कम व पॅन कार्ड लांबवले. आझादनगर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी गोपनीय माहितीद्वारे अवघ्या दोन तासात आरोपी निष्पन्न केला. दुकानातील कामगार राकेश रामलाल सावले (34, गरणगाव, भगवानपुरा, खंडवा, ह.मु.वंजारी गल्ली, पाटबाजारामागे, जुने धुळे, धुळे) याने चोरीची कबुली देत घरातून रोख रक्कम, पॅन कार्ड, व्हिजिटींग कार्ड व टॉमी जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, हवालदार शशिकांत देवरे, मुकेश वाघ, प्रशांत चौधरी, संतोष हिरे, चेतन बोरसे, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !