भुसावळ डीआरएम यांनी भुसावळ-मनमाड मार्गाची केली पाहणी


Bhusawal DRM inspected the Bhusawal-Manmad route भुसावळ (29 एप्रिल 2025) : भुसावळ रेल्वेच्या डीआरएम ईती पाण्डेय यांनी सोमवार, 28 रोजी भुसावळ-मनमाड रेल्वे मार्गाची विंडो ट्रेलिंगद्वारे पाहणी केली. पाहणीदरम्यान स्थानक स्वच्छता, प्रवासी सुविधा उपलब्धता व गुणवत्ता, रेल्वे रुळांची स्थिती, सिग्नल व दूरसंचार (एसअँडटी) यामधील सुधारणा, लेव्हल क्रॉसिंगची स्थिती तसेच लहान पुलांची तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले.

मनमाड स्थानकाची पाहणी
पानेवाडी येथे बीपीसीएल सायडिंगवरील तेल लोडिंग प्रक्रियेची तपासणी करण्यात आली. गँट्रीवर टँक वॅगनमध्ये होणार्‍या तेल भरण्याची कार्यपद्धती, मास्टर वॉल्व्ह व डोम कव्हर योग्यरीत्या बंद करण्याचे महत्त्व, तसेच सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन यावर त्यांनी भर दिला. मनमाड स्थानकावरील विविध यंत्रणांची सविस्तर पाहणी करताना, प्रवाशांसाठी पुरविण्यात येणार्‍या सेवा, त्यांचा दर्जा आणि सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. कामांना गती देऊन प्रवासी अनुभव अधिक सुखकर करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना निर्देश दिले.


आरपीएफ बॅरेकची पाहणी
मनमाड रेल्वे यार्डमध्ये ट्रॅकची तपासणी करून त्याच्या देखभाल कार्यांची व सुरक्षाविषयक उपाययोजनांची बारकाईने समीक्षा करण्यात आली. यानंतर, रिले रूममध्ये भेट देत, सिग्नलिंग यंत्रणेच्या कार्यप्रणाली, उपकरणांची देखभाल व आपत्कालीन यंत्रणांचे परीक्षण करण्यात आले. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) बॅरक्सचीही पाहणी करण्यात आली. आरपीएफ जवानांच्या निवास, मूलभूत सुविधा आणि त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा यावर चर्चा करण्यात आली. लोको पायलटसाठी असलेल्या रनिंग रूमचीही तपासणी केल्यानंतर कर्मचार्‍यांच्या अडचणी जाणून घेतल्या गेल्या. या पाहणी दरम्यान संबंधित विभागांचे वरिष्ठ शाखा अधिकारी व पर्यवेक्षकही विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासोबत उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !