चाळीसगावात 25 लाखांचा गांजा जप्त : मालेगावातील संशयीताला बेड्या


Ganja worth Rs 25 lakh seized in Chalisgaon : Suspect from Malegaon arrested चाळीसगाव (30 एप्रिल 2025) : चाळीसगाव शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका वाहनातून तब्बल 25 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करीत मालेगावातील संशयीताला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडील चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. शेख नदीम शेख बशीर (40, गुलवानी खालदा, गल्ली नं. 3, मालेगाव, जि.नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गस्तीदरम्यान कारवाई
चाळीसगाव शहर पोलीस बुधवारी पहाटेच्या सुमारास गस्तीवर असताना मालेगाव रोडवरील धुळे ते छत्रपती संभाजीनगर बायपास चौफुली येथे वाहनांची तपासणी करत असताना पांढर्‍या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर (एम.एच.12 के.एन. 2305) ची तपासणी केली असता डिक्कीमध्ये निळ्या रंगाच्या चार प्लास्टिक पिशव्यात गांजासारखा वास असलेला पदार्थ आढळला. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना प्रकार कळवल्यानंतर त्यांनी धाव घेत पंचनामा करण्यात आल्यानंतर वाहनात गांजा असल्याचे स्पष्ट झाले. या गांजाचे एकूण वजन 42 किलो 583 ग्रॅम असून त्याचे अंदाजित बाजारमूल्य 24 लाख 69 हजार 150 रुपये आहे. गांजा वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी जप्त करण्यात आली. आरोपीविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, योगेश माळी, कैलास पाटील, अरुण बाविस्कर, पोलीस हवालदार राहुल सोनवणे, विनोद पाटील, योगेश बेलदार, अजय पाटील, पोलीस नाईक भूषण पाटील, राकेश पाटील, नितीन आगवणे, महेंद्र पाटील, नरेंद्र चौधरी, अमोल भोसले, निलेश पाटील, नाना बच्चे, आशुतोष सोनवणे, विजू पाटील, राकेश महाजन, समाधान पाटील, दीपक चौधरी, पवन पाटील, महिला पोलीस शिपाई सभा शेख आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !